उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी

 

पंढरपूर, २७/१०/२०२०-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी आज एकादशी दि २७/१०/२०२०  रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदीरजवळील संत नामदेव महाराज पायरी येथे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार भारत भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके व कुटूंबीयांना दीर्घायुष्य लाभावे व ते कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक प्रार्थना करुन व साकडे घातले.  

  यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे,शहर संघटक विजय मोरे,सचीव सागर कावरे,सुमीत शिंदे, उपाध्यक्ष दादा थिटे,उपाध्यक्ष विशाल डोंगरे, रामचंद्र खडकेंसह सर्व राष्ट्रवादी युवकचे पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top