केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नवीदिल्ली,दि. ०८/१०/२०२० - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभरात लोकप्रिय असलेला दलितांचा द्रष्टा नेता संसदीय राजकारणातील लोकप्रिय चेहरा हरपला आहे . त्यांच्या निधनाने देशाचे नुकसान झाले आहे. भारतीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत रामविलास पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
Top