पंढरपूर तालुक्यातील विविध प्रश्नांकडे रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे वेधले लक्ष, दिपक चंदनशिवे यांच्या मागणीची घेतली दखल
पंढरपूर, २२/१०/२०२०- समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थीसाठी सुरू असलेली शासकीय वस्तीगृह इमारत ही भाडे तत्वावर निवासी राहण्यासाठी घेतली आहे. गेली अनेक वर्षापासून हे वस्तीगृह भाडे करार संपल्यावर इतरत्र हालवावे लागत असल्याने ते एकाच ठिकाणी व्हावे यासाठी लागणारा ५ कोटी रुपये खर्च मंजूर करुन ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांची होणारी ससेहोलपट थांबवावी तसेच अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील दळवळणासाठी रस्तावरील ओढ्या नाल्यावर असण्यार्या अरुंद पुल सिडी वर्क यांच्या उंची कमी असल्याने पावसाच्या पाण्याने वाहतुकीस मोठा अडथळा तर होतोच परंतु पुराच्या पाण्याने शेतीच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान होते.त्यासाठी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलाव सांडवा ते कौठाळी पर्यंत किमान ५० कि.मी अंतरामधील सर्वच रस्त्यावरील पुलाची उंची ८ ते १० फुटांनी वाढवण्याची मागणी RPI रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना करण्यात आली होती .

त्यावेळी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे असे रिपाई नेते दिपक चंदनशिवे यांनी सांगितले आहे.
 
Top