श्री पांडुरग सहकारी साखर कारखान्याचा सभासद शेतकऱ्यांना दिलासा

      श्रीपूर , ०८/१०/२०२०- श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२०-२१ चा बॉयलर अग्नी प्रदीपन सभारंभ कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी मा.आ. कै.सुधाकरपंत परिचारक यांचे सहकारी ज्येष्ठ उस उत्पादक सभासद लक्ष्मण सोपान डुबल अजनसोंड,ज्ञानोबा राजाराम शिंदे रांजणी, वसंत बाबुराव चव्हाण बाभूळगाव,शिवाजी दत्तात्रय देशमुख कासेगाव, ज्योतीराम रामचंद्र चव्हाण बाभूळगाव, दादा नारायण यलमर सुपली ,धोंडीबा घनश्याम पाटील आव्हे, अनंत दिगंबर राजोपाध्ये रांजणी, संदिपान भीमराव वाडेकर शिरगाव, शामराव सखाराम लोखंडे भंडीशेगाव,सिताराम ज्ञानोबा बागल गादेगाव ,आबासो जयवंत गायकवाड चिं.भोसे, कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंत देशमुख,माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी, युवा नेते प्रणव परिचारक ,उमेश विरधे यांचेसह सर्व आजी-माजी संचालक मंडळ, विविध बँकेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


सत्यनारायण महापूजा कारखान्याचे विद्यमान संचालक परमेश्वर गणगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली.या कार्यक्रमासाठी श्रीपूर, बोरगाव,महाळुंगमधील सर्व नेतेमंडळी,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,ऊस उत्पादक सभासद, कामगार युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी पांडुरंगचा अंतिम हप्ता २०६ रुपये जाहीर करून ही रक्कम दोन दिवसांत खात्यावर जमा होणार आहे असे सांगितले.
 
Top