प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन करा,अफवांवर विश्वास ठेवू नका-विवेक परदेशी,आरोग्य सभापती
 

    पंढरपूर , १५/१०/२०२० , (प्रशांत खंडागळे)  - अतिपर्जन्यवृष्टीमुळे चंद्रभागा नदीची पाणीपातळी flood situation वाढत आहे. गत वर्षीच्या पुर परिस्थितीप्रमाणे पाणी पंढरपूर शहरात पाणी येणार आहे. याप्रसंगी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रांताधिकारी सचीन ढोले, आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी वाढत्या पाणीची पाहणी करुन नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.

पुर रेषेखालील राहणाऱ्या नागरिकांना त्वरित स्थलांतर होण्याबाबत सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.सोशल मीडियावरील कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता त्वरीत स्थलांतर करावे. काही अडचण आल्यास अथवा आपत्ती परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरीत नगरपालिका प्रशासनास संपर्क करा अशाही सूचना देण्यात आल्या.

नदीच्या पाणीपातळीबद्दल प्रशासनाच्या,नगर पालिकेचेवतीने वरचेवर अधिकृत माहिती देण्यात येत आहे.प्रत्येक भागात नगरपालिका , प्रशासनाचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.पर्जन्यमानाला थांबवणे आपल्या हातात नाही, पण येणाऱ्या परिस्थितीचा सामना आपण सर्वजण मिळून करावयाचा आहे.
प्रशासनाच्या सुचनेकडे लक्ष द्यावे अशी विनंती नागरिकांना करण्यात आली असून प्रशासनाला सहकार्य करून आपण या संकट काळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु असे सांगण्यात आले.
 
Top