नरवीर विरयोध्दा जिवाजी महाले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पंढरपूर,१०/१०/२०२०-पंढरपूर येथील हेअरपोर्ट सलुनमध्ये नरवीर विरयोध्दा जिवाजी महाले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पंढरपूर शहर पोलीस विभागात दामिनी पथकात कार्यरत पोलीस कुसुमताई क्षिरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मारुती भोसले म्हणाले , सर्व आदरणीय व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी साजरी केल्यामुळे त्यांचा इतिहास नवीन पिढीला माहीत होतो. ही आज काळाची गरज आहे.

कुसुमताई क्षिरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

यावेळी कुसुमताई क्षिरसागर यांचा सत्कार शरयू व समृद्धी मारुती भोसले यांनी केला.याप्रसंगी नाभिक युवक संघटनेचे अध्यक्ष पैलवान महेश माने ,पुुरुषोत्तम राऊत सर ,गणेश माने ,तुकाराम चव्हाण ,डॉ.अशोक नागटिळक ,नवनाथ जाधव व प्रा.मारुती भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टनसिंग पाळून पार पडला.

नाभिक युवक संघटनेचे मारुती भोसले यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. 
 
Top