एकूण ४ लाख ४७ हजार ३०९ नागरिकांची  आरोग्य तपासणी करण्यात आली

   पंढरपूर,दि ०८/१०/२०२० - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी my family my responsibility ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत तालुक्यामध्ये शहरातील ९६ हजार २३८  व ग्रामीण क्षेत्रातील ३ लाख ५१ हजार ७१ असे एकूण ४ लाख ४७ हजार ३०९ नागरिकांची  आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.     

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम १५ सप्टेंबर २०२० पासून केली आहे.या मोहिमेतंर्गत प्रशासनाच्यावतीने तालुक्यातील शहरी भागात १७ व ग्रामीण भागात १६५ आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक शहरात प्रत्येक वार्डातील दररोज ५० घरांना तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावांतील दररोज ५० घरांना भेटी देवून कुटुंबातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. तपासणीमध्ये घरातील प्रत्येक सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तसेच कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेवून ताप,खोकला,दमा, ऑक्सिजन पातळी कमी भरणे अशी कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांची कोविड 19 ची तपासणी करुन आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले जात असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.        
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम १५ सप्टेंबर २०२० पासून सुरु असून या मोहिमे तंर्गत तपासणीमध्ये घरातील प्रत्येक सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तसेच कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेवून ताप,खोकला,दमा, ऑक्सिजन पातळी कमी भरणे अशी कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांची कोविड 19 ची तपासणी करुन आवश्यक ते वैद्यकीय उपचार करणार असल्याचे जाहीर केले असले तरी अनेक ठिकाणी फक्त माहिती भरुन घेण्यात येत आहे तपासणीसाठी पथक येत आहे असे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात पथक येत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.  
  नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या साठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. ताप आल्यास सर्दी, खोकला, धाप लागणे, थकवा येणे अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
 
Top