कुर्डुवाडीमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारीचा दुसरा टप्पा सुरु योजनेमुळे शहरातील कोरोना संख्या नियंत्रणात

 कुर्डुवाडी,(राहुल धोका) १६/१०/२०२०- महाराष्ट्र शासन ,जिल्हाधिकारी सोलापूर व उपविभागीय अधिकारी, माढा विभाग ,कुर्डूवाडी नगरपरिषद परिसरात covid-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" कोविड मुक्त महाराष्ट्र ही दुसरी फेरी ही मोहीम नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर व स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू करण्यात आली आहे.

कुर्डूवाडी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेला नागरिकांनी पहिल्या फेरीत अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तसाच दुसऱ्या फेरीलाही प्रतिसाद द्यावा - समीर भूमकर , मुख्याधिकारी,नगरपरिषद कुर्डूवाडी
  या योजनेचा पहिल्या टप्पा यशस्वी झाला असून कोरोणाची रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कुर्डुवाडी शहरांमध्ये दिनांक १६/ १०/२०२० ते २५/१०/ २०२० या दिवसांपर्यंत चालू राहील.या मोहिमे अंतर्गत १२ टीम तयार करण्यात आल्या आहेत.


कुर्डूवाडी शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोनाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. नागरिकांना,भाजी विक्रेत्यांना, व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांची कोरोना टेस्ट करून घ्यायची राहिलेली आहे त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ शाळा क्रमांक ३ येथे स्वतः जाऊन कोरोना टेस्ट करून घेऊन नगर पालिकेस सहकार्य करावे - नगराध्यक्ष समीर मुलाणी
   या टीमने कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती घेऊन थर्मामीटर, ऑक्सीमिटर,ताप तपासणी करुन spo2 जर ९५ पेक्षा कमी असले, कोमाँरबीड कंडिशन या तिन्हीपैकी कोणतीही दोन लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस हाय रिस्क संबोधून त्वरित ट्रीटमेंटसाठी कोवीड केअर सेंटर येथे संदर्भित करणार येणार आहे. या योजनेमध्ये पर्यवेक्षक म्हणून अतुल शिंदे व कोमल वावरे हे काम पाहत आहेत तसेच टीमची आलेली माहिती संकलन करून डाटा अपडेट करण्याचे काम अभिजीत पवार हे पाहणार आहेत . या १२ टीम मधील छत्तीस लोक हे नगरपालिकेतील अकाउंट विभाग,आस्थापना विभाग,पाणीपुरवठा विभाग, कर विभागातील असणार आहेत.
 
Top