पंढरपूर, २५/१०/२०२०- पंढरपूर शहर पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद केली असून तीन लाख ४५ हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटार सायकली जप्त केल्या आहेत.पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 495 20 20 भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे दिनांक २८/०७/२०२० रोजी दाखल केले असून सदर गुन्ह्याचे तपासकामी पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर विभाग व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे आकाश फिरंगीनाथ बामणे व त्याच्या साथीदाराने पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील व इतर ठिकाणाहून मोटरसायकली चोरलेले आहेत. या मोटरसायकली पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात जप्त आहे त्यानंतर त्यांच्याकडे झालेल्या अधिक चौकशी वरील मोटरसायकल चोरीबाबत पंढरपूर शहर, करकंब,सातारा,सांगली, इंदापूर,विटा,मिरज शहर इत्यादी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. वरील आरोपीचा एक साथीदार फरार असून लवकरच त्यास अटक करून पंढरपूर शहर हद्दीतील आणि परिसरातील आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

 सदरची कामगिरी ही सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी करण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड, पोहेकॉ सुजित उबाळे,पोहेकॉ बिपिन चंद्र ढेरे,पोहेकॉ सुरज हेंबाडे,पोना सतीश चंदनशिवे,पोना मच्छिंद्र राजगे,पोना गणेश पवार, पोना इरफान शेख,पोना अभिजित कांबळे, पोना शोएब पठाण ,पोना प्रसाद औटी,पोना संदीप पाटील, पोकॉ सिद्धनाथ मोरे, पोकॉ संजय गुटाळ, पोकॉ समाधान माने यांनी केली असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोना गणेश पवार हे करीत आहेत.
 
Top