नागपूरच्या संयुक्त प्रादेशिक केंद्राद्वारे सदर हेल्पलाईनवर समुपदेशन

     नागपूर,PIB Mumbai,२३ ऑक्टोबर २०२० - केन्द्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ.थावरचंद गेहलोत यांनी ७ सप्टेंबर २०२० रोजी मानसिक आरोग्य पुनर्वसन फ्री हेल्पलाइन ‘किरण’ या चोवीस तास विनामूल्य सेवेची सुरूवात दिल्ली येथून व्हर्चुअल पद्धतीने केली. सदर हेल्पलाईन क्रमांक - 1800-599-0019 हा मानसिक आजार होण्याच्या वाढत्या घटनेकडे, विशेषत: कोविड-१९ चा आजार लक्षात घेता फार महत्वाची कामगिरी बजावणार आहे. या मानसिक आरोग्य पुनर्वसन सेवा फ्री हेल्पलाइनद्वारा मानसिक रुग्न व्यक्तींचा शोध,प्रथमोपचार,मानसिक समर्थन,ताण व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य,सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन, मानसिक संकट व्यवस्थापन इत्यादी सेवा प्रदान करण्यात येतील.

नागपूरच्या यशवंत स्टेडीअम स्थित केन्द्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अधीन दिव्यांगजण सशक्तीकरण विभागांतर्गत असणा-या संयुक्त प्रादेशिक केंद्राद्वारे सदर हेल्पलाईनवर समुपदेशन केले जाईल ,अशी माहिती संयुक्त प्रादेशिक केंद्राचे संचालक गुरबक्शचंद जगोटा यांनी दिली आहे.
या फ्री हेल्पलाइनचा मुख्य हेतू तणाव, चिंता, नैराश्य,घाबरलेल्या लोकांना सेवा,ताण, समायोजन विकार,अत्यंत क्लेशकारक तणाव विकार, पदार्थाचा गैरवापर,आत्महत्येचा विचार, साथीच्या आजाराने प्रेरित मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थिती मदत करणे हा आहे.
ही फ्री हेल्पलाइन सेवा १३ भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, पंजाबी, ओडिया, गुजराती, मराठी, कन्नड, मल्याळम, तामिळ, बंगाली, तेलगू, आसामी आणि उर्दू) २४x७ मध्ये तीन स्तरावर कार्य करते, पहिल्या टप्प्यात कॉलर प्रथम स्थान आधारित हेल्पलाइन केंद्रांशी जोडले जातील जे राष्ट्रीय संस्था, संयुक्त प्रादेशिक केंद्रे, विभागाचे प्रादेशिक केंद्रे सल्ला, समुपदेशन आणि संदर्भ प्रदान करण्यासाठी कुटुंबे, संस्था, पालक संघटना, व्यावसायिक संघटना, पुनर्वसन संस्था, रुग्णालये किंवा देशभरातील मदतीची गरज असणा-या कोणालाही एक जीवनरेखा म्हणून काम करेल. द्वितीय स्तरावरील ६६० तज्ञ क्लिनिकल मानस शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ जे सेवा देण्यास तयार आहेत,गरजू व्यक्तींच्या आवश्यकते नुसार सेवा आणि सुविधा प्रदान केल्या जातील आणि तीस-या टप्प्यात पाठपुरावा आणि भविष्या तील समर्थनाच्या बाबतीत सेवा प्रदान केल्या जातील.
 
Top