मराठा आरक्षणासंदर्भातील खटल्याची सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी २७ ऑक्टोबरला

नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या अत्यंंत संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील खटल्याची सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी असणार आहे. ९ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य करतानाच आरक्षणाला स्थगिती दिली होती.या निर्णया मुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता .

त्यानंतर राज्यात या मुद्द्यावरून वादळ उठलं आहे. त्यामुळे आता या खटल्यात २७ तारखेला नेमकं काय होणार ? स्थगिती उठवण्याबाबत काही निर्णय होणार का ? का नेहमी प्रमाणे हे प्रकरण तापत राहणार आणि त्याचा उपयोग फक्त राजकीय कारणांसाठी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार  आहे .

महाराष्ट्र सरकारच्यावतीने आणि या प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण तातडीने पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे यावं आणि आरक्षणावरची स्थगिती उठवावी या मागणीसाठी अर्ज केला आहे .
 
Top