चंद्रभागा नदी प्रदुषण विरहीत व स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार पाठपुरावा

   पंढरपूर,(प्रतिनिधी),दि.२६/१०/२०२० - महर्षी वाल्मिकी संघ या रजिस्टर्ड सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी इसबावी, पंढरपूर येथील सुनील मारुती म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या महर्षी वाल्मिकी संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सुनील म्हेत्रे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची नियुक्ती केली आहे. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आजतागायत विविध सामाजिक कार्यात आघाडी घेतलेली आहे. आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर महादेव कोळी जमातीच्या दाखल्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यास यश मिळाले असून अनेकांना जातीचे दाखले मिळाले आहेत.सामुदायीक विवाह सोहळे,सर्व महापुरुषांच्या जयंत्या,कोरोना,महापुर आदी संकट काळात उल्लेखनीय कार्य केले. लाखो वारकर्‍यांचे तिर्थस्थान चंद्रभागा नदी प्रदुषण विरहीत व स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. दुर्बल, वंचीत, शोषीत पिडीत, मतीमंद , निर्वासीत , बेवारस, अपंग यांचेसाठी उल्लेखणीय कार्य महर्षी वाल्मिकी संघाने केलेले आहे.

    अनेक भरीव समााजिक कार्यात सक्रीय असलेल्या महर्षी वाल्मिकी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल वरिष्ठांचे व संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचा आभारी असून माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन व संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटनेच्या विविध कार्यात सक्रीयपणे सहभागी होईल, असे मत यावेळी नुतन जिल्हा उपाध्यक्ष सुनील म्हेत्रे यांनी व्यक्त केले. 

   यावेळी गणेश अंकुशराव, राहुल परचंडे,संदीप घंटे,निलेश माने,सुरज कांबळे, संपत सर्जे, नितेश म्हेत्रे,अक्षय म्हेत्रे, स्वप्नील गायकवाड, प्रज्योत देशमुख,महेश सेवान,संकेत गायकवाड, अभिजीत बेसुळके,मुबीन तांबोळी,विश्‍वजीत करपे,करण पंगुडवाले, प्रकाश मगर, आदित्य जाधव रंजीत लवटे,निखील धनवडे,गणेश जवारे, सुहास डुरे-पाटील, मुन्ना म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्र आदी उपस्थित होते.
 
Top