फलटण,२३/१०/२०२० - महाराष्ट्र शाळा कृती समिती च्यावतीने फलटण तालुक्यातून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे लिपिक अमर र.शेंडे यांना सन- २०१९-२०२० चा कृतिशील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आज कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते व सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सचिन नलवडे,सातारा जिल्हा शाळा कृती समिती अध्यक्ष विजय येवले,फलटण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र रेपाळ,माजी अध्यक्ष सुर्यवंशी सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री.खुरंगे सर,माजी प्राचार्य अर्जुन रूपनवर सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    या पुरस्काराबद्दल महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे व सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ, सर्व संस्था पदाधिकारी व शाळेतील शिक्षक यांनी अमर शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
 
Top