भारताने ओलांडला १० कोटी चाचण्यांचा टप्पा

   नवी दिल्ली ,२३/१०/२०२० - भारताने जानेवारी २०२० पासून कोविड चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. आता पर्यंत एकूण १० कोटी (10,01,13,085) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासात १४.५ लाख कोविड चाचण्या 

गेल्या चोवीस तासात 14,42,722 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील चाचण्यांच्या क्षमतेत कित्येक पटीने वाढ झाली असून देशात राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्याने सध्या जवळपास २००० प्रयोगशाळा सुरू आहेत.याद्वारे दररोज सुमारे १५ लाख नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते.मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पॉझिटीव्हीटी दरही कमी होत आहे. याचाच अर्थ रोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण कमी होत आहे. एकूण चाचण्यांनी 10 कोटींचा टप्पा पार केल्यामुळे एकूण दरात घट होत आहे. राष्ट्रीय पातळीवर पॉझिटीव्हीटी दर आज ७.७५% आहे.

देशातील चाचण्यांच्या संख्येत वाढ होण्यात चाचण्यांच्या पायाभूत सुविधांमधील सुधारणा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. देशातील १९८९ चाचणी प्रयोगशाळांमध्ये ११२२ सरकारी प्रयोगशाळा आणि ८६७ खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. दैनंदिन चाचणी क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.व्यापक प्रमाणात जास्तीत जास्त चाचणी केल्यामुळे बाधित रुग्णांची लवकर ओळख पटणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे व ट्रेसिंग द्वारे त्वरित तपासणी करणे आणि गंभीर स्वरुपाच्या घटनांमध्ये घरे / सुविधा आणि रूग्णालयात वेळेवर व प्रभावी उपचार केले जात आहेत.या उपाययोजनांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. शेवटच्या १ कोटी चाचण्या ९ दिवसात घेण्यात आल्या.

    केंद्र सरकारच्या यशस्वी टेस्ट,ट्रॅक,ट्रेस,ट्रिटमेंट आणि टेक्नॉलॉजी धोरणाचा हा परिणाम असून हे धोरण राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडूनही यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
 
Top