मोहोळ,(प्रतिनिधी),१७/१०/२०२० - भीमा नदीला महापूर आल्यामुळे मोहोळ तालुक्यातील कुरूल जिल्हा परिषद गट मतदारसंघातील मिरी अरबळी बेगमपूर अर्धनारी येथील गावामध्ये शेतामध्ये नदीकाठच्या वाडीवस्तीवर पाणी आल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांची सोय करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात गेली असून घरा मध्ये पाणी शिरले आहे .


शेती,घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून सध्या कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला असून आता आसमानी संकटामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापलेला आहे त्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. या ठिकाणी जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करुन माहिती घेतली.
शेतीच्या व घराची झालेली पडझड दगावलेली अथवा पुरामध्ये वाहून गेलेली जनावरे असतील अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे,गोरगरीबांचे शेतीचे व घराचे पंचनामे त्वरीत करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे प्रशासनला सांगितले असून शासनाकडे पाठपुरावा करुन पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देणार - शैला गोडसे जि.प.सदस्या
यावेळी मा.संरपच रफीक पाटील,उपसंरपच बसवेश्वर पुजारी चंद्रकांत सरवळे प्रकाश पाटील बबन राऊत,तलाठी मिरी बि.डी.महाडीक ,तलाठी अरबळी गणेश साठे, प्रताप सतफळ,अशोक सतफळ,मानतेश दिंडोरे सुखदेव कोळी, सुनिल राऊत,नागनाथ भोई,अजिनाथ भोई,अंकुश भोई, तुकाराम भोई आदी शेतकरी उपस्थित होते.
 
Top