कुर्डुवाडी,(राहुल धोका),३०/१०/२०२० - कोरोनामुळे विविध क्षेत्रात काम करणारे कामगार यांच्या अडचणी तसेच लिडरशीप ट्रेनिंग प्रोग्राम पंचायत समिती कुर्डूवाडी येथील कै विठ्ठलराव शिंदे सभागृह येथे संपन्न झाला.


या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील एकूण २० युनियनमधील १७ लीडर व ३ महिला लीडर यांना वर्तमान काळातील सुरक्षा आव्हाने तसेच covid-19 मधील घ्यावयाची काळजी व जबाबदारी या विषयावर अँड.लक्ष्मण माने,महिला दक्षता कमिटी व तक्रार निवारण केंद्रप्रमुख यांनी मार्गदर्शन केले.


संघटनेच्या कार्याध्यक्षा श्रीमती लता रोहिदास मोरे अध्यक्षस्थानी होत्या.त्यांनी आलेल्या सदस्यांना कामगार संघटनेची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील पुणे विभागातील २० कामगार युनियन यांच्या कार्याचा आढावा सादर केला.त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनेतील कामगारांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले .

वीरेंद्र कांबळे यांनी रजिस्ट्रेशन केले .सत्यजित जानराव ,कार्यकारी सदस्य यांनी यांचे स्वागत केले.संतोष गायकवाड (शिक्षक संघटना अध्यक्ष) नागनाथ सोनवणे विश्वास गजनार यांनी आपले विचार मांडले.

भारत वजाळे यांनी ऊसतोड कामगार,वीटभट्टी कामगार ,हमाल तोलार कामगार यांच्या अडचणी सांगितल्या .

सूत्रसंचालन सचिन सोनवणे,नयुम इनामदार यांनी केले.आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षक संघटना उपाध्यक्ष उत्कर्ष मोरे व दिपक जाधव यांनी केले.
 
Top