कुर्डुवाडीत भुयारी गटाराचा झाला राडा Kurduwadi underground drainage
   कुर्डुवाडी,(राहुल धोका),२२/१०/२०२० -कुर्डुवाडी शहर नगरपरिषदअंतर्गत अनेक ठिकाणी आज ही ग्रामपंचायत कालीन गटारी आहेत.नविन वसाहती सोडुन इतर ठिकाणी वर्षानुवर्षे गटारीची दुरावस्था झालेली आहे .शहरात अनेक ठिकाणी पुतळे , मंदिरे या भागातून गटारी गेल्यामुळे शहरातील गटारी नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत.कुर्डुवाडी नगरपरिषदसाठी भुयारी गटारी निर्मीतीसाठी ४७ कोटी निधी मंजुर झाला आहे.अत्यंत जीर्ण झालेल्या गटाराचे शहर अशी शहराची ख्याती झाली आहे. नविन गटारांची व्यवस्था शहरासाठी अत्यंत गरजेची होती.


भुयारी गटार ही संकल्पना आणि वास्तविक चालु काम यात मात्र ताळमेळ नसल्याने तसेच ऐन पावसाळ्यात काम चालु ठेवुन कामाच्या ठिकाणी बॅरकेटींग , न लावल्यामुळे लहान मोठे अपघातांचे प्रसंग उदभवले. त्यामुळे या योजनेस विरोध सुरु झाला.


भुयारी गटार म्हणजे मोठी भुयार अशी सर्व सामन्यांची कल्पना आहे . या योजनेत काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी मोठे असे विविध आकराचे प्लॅस्टीक पाईप ही वापरलेले दिसत  आहेत अशी चर्चा चालू आहे. सदर योजनेचे काम आता शहराच्या बाह्य भागात पुर्ण होत आले आहे .लवकरच शहरातील मध्य भागात ही योजना सुरु झाल्यानंतर खरी तारेवरची कसरत होणार आहे .

       योजनेत घोटाळ्याचा आरोप 

   कुर्डुवाडी नगरपरिषद राबवत असलेल्या या योजने काही घोटाळा झाला असून अद्याप मल विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही तर योजना अस्तित्वात का आली ? असे प्रश्न घेवून उपविभागीय‌ आधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले. 

सदर योजनेमुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्या रस्त्यांवर अवकळा पसरली आहे.  शहरात खडीच खडी झाली असून शहरात दुरावस्था निर्माण झाली. ज्या भागात ही योजना पुर्ण झाली किमान त्या भागात तरी तात्काळ रस्ते करणे गरजेचे होते परंतु तशी कोणतीहि परिस्थिती सद्या दिसत नाही. 

    सदर योजना २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात सुरु झाली. वर्षानंतरही निम्मे कामसुध्दा पुर्ण झालेले नाही. ही योजना फडणवीस सरकराने दिली पुढे ठाकरे सरकारने ती रद्द केली परंतु जिकरीचे प्रयत्न करुन ही योजना कुर्डुवाडी नगरपरिषदेने राबवली, पण त्याच्या फायदा होण्यापेक्षा राजकिय तोटा होणार असेच जनमत तयार झाले आहे. ही योजना योग्य रीतीने राबविली तर डास निर्मुलन होवुन डेंग्यु सदृष्य रोगांवर नियंत्रण मिळु शकणार आहे. मात्र यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छा शक्ती आवश्यक आहे.कारण कुर्डुवाडी नगर परिषद ही राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहे.    

     अनेकानी यात धुतले हात 

  भुयारी गटार विरोधात जाणारे आणि अपघाती व्यक्तींनी पैसे कमवले अशी ही कुजबुज सर्वत्र सुरू आहे.भुयारी गटार अनेकांसाठी जमीनीतुन निघालेला खजिन बनला गेला आहे.  

गटारीचे काम करताना अनेक ठिकाणी २०० फुटा च्या अंतरावर चेंबर बांधले गेले हीच या योजनेची जमेची बाजु असून भविष्यात या गटारी टिकणार कि परत पुर्वीच्याच गटारी उपयोगी पडणार याचे उत्तर मिळणार आहे.  

  सध्या निम्म्या निधीचा वापर झाल्याने ही योजना बंद पडणार नाही अशी परिस्थिती आहे. या योजने वर नगरविकास खाते, सोलापुर यांचे नियंत्रण आहे .पहाणीसाठी एक इंजिनियरची नियुक्ति ही केलेली आहे मात्र नंतर सदर इंजिनियर या भागात आलेच नाहीत असे नागरिकांतून बोलले जात आहे.   

      नगररचना सोलापुर आयुक्त, उपप्रशासन अधिकारी , नगर परिषद पुणे विभाग, पुणे यांनी हे काम व्यवस्थित झाले कि नाही याची चौकशी करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
 
Top