कुर्डुवाडी व्यापारी संकुल अवास्तव भाडे आकारणी त्यामुळे अनेक गाळे रिकामे

कुर्डुवाडी
,(राहुल धोका),३१/१०/२०२०-कुर्डुवाडी शहरात अनेक व्यापार संकुल आहेत.यात महात्मा जोतिबा फुले, स्व.बाळासाहेब ठाकरे आदी व्यापारी संकुलात अवास्तव भाडे आकारणी करण्यात आलेली आहे.

     लाॅकडाऊनच्या काळामुळे उत्पन्न कमी व भाडे जादा अशी परिस्थिति झाल्यामुळे शहरातील अनेक गाळेधारक भाडे पोटीची रक्कमही भरु शकले नाहीत. त्यामुळे त्या भाड्यावर व्याजवर व्याज असे लावण्यात आले आहे . त्यामुळे सदर गाळेधारकांची आर्थिक परिस्थिति अत्यंत नाजूक असल्याचे चित्र आहे.

   अनेक गाळ्यात सलून व्यवसायिक आहेत नेहमी दाढीसाठी येणारे लोक सध्या घरीच दाढी करतात त्यामुळे व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. 
नगर रचनाकार ,सोलापुर यांनी गाळे धारकांचे पुन्हा मुल्यांकन करावे, त्यांना वस्तुस्थिती लक्षात आणुन द्यावी, व्यापारी तत्वावर बांधलेले अनेक गाळे बंद आहेत त्यामुळे नगरपरिषदचे आर्थिक नुकसान होते पर्याय म्हणून नगरपरिषद करातील अन्यायकारक वाढ कमी करून नागरिकांचे होणारे आर्थिक शोषण कमी करावे. - डाॅ विलास मेहता,अध्यक्ष,कुर्डुवाडी व्यासपिठ
      ठाकरे व्यापार संकुल येथे दहा हजार इतका प्रचंड भाडे आकार नगर रचनाकार सोलापुर यांनी केला आहे.कुर्डुवाडी शहर हे निम विकसित शहरात मोडले जाते.अशा वेळेस लादलेले भाडे हे प्रचंड असल्याने शहरात नगरपरिषद उत्पन व व्यापारी सोयीसाठी उभे केलेल्या संकुलात अनेक गाळे रिकामे ठेवण्याची नामुष्की नगरपरिषदेवर ओढावली‌ आहे.

  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बार्शी येथे स्वतः लक्ष देवून लाॅकडाऊन काळातील व अवास्तव भाडे कमी करण्यासाठी लक्ष दिले तसेच कुर्डुवाडी नागरिकांसाठी ही त्यांनी आदेश द्यावेत अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे.
 
Top