कुर्डुवाडीमध्ये भाजपाचा कोरोनामुक्तीसाठी उपक्रम Kurduwadi bjp

  कुर्डुवाडी,(राहुल धोका)- भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण कुर्डूवाडी शहराची Oxygen Saturation आँक्सिजन तपासणी व तापमान Temperature तपासणी, कोरोना विषयी जनजागृती करून दहा हजार कुटुंबांना अर्सेनिक अल्बमचे वाटप व संपूर्ण कुर्डूवाडी शहर सोडीयम हापोक्लोराईड व नोआन जंतूनाशक फवारणीचा शुभारंभ माढा विभागाच्या प्रांताधिकारी जोती कदम यांचे हस्ते करण्यात आला.

फवारणीच्या ट्रॅक्टरचे उद्घाटन पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे , नगरपरिषद आरोग्य निरिक्षक बाळासाहेब पायगण यांचे हस्ते करण्यात आले.

      ही तपासणी पाच पथकांमार्फत करण्यात येत असून पथकातील या लोकांना फेसशिल्ड मास्क, माउथ मास्क, हॅडग्लोज,सॅनिटायझर इत्यादी साहीत्य देऊन त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे.ही तपासणी नगरपालिकेच्या अँसेसमेंट वाॅर्डरचनेप्रमाणे पाचही वाॅर्डमध्ये करण्यात येणार आहे.

   याप्रसंगी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास शहा,संजय टोणपे,अमोल कुलकर्णी, सुभाष लेंगरे,रावसाहेब मुसळे,संजय गंभीरे, मुश्ताक बागवान,अतुल राऊत, राजकुमार बागल, अनंत राऊत, सुनील मुसळे, कुलदीप बारंगळे, सुभाष इंदलकर ,विजय कोकाटे ,सुरज देशमुख, अविनाश धोत्रे, विजय कदम, बाळासाहेब शेंडगे, संतोष टोणपे, असिफ शेख, गणेश समदाडे, धनंजय वाघमोडे, अनील मोरे, आकाश ढेकळे, अनील कांबळे, अयूबभाई आतार, शुभम बनसोडे, सुहास गंभीरे, प्रवीण मुसळे, रवी मुसळे, किरण पवार,शरद गाडे,सद्दाम शेख,ओंकार म्हस्के आदी उपस्थित होते. 

  क्षितीज टोणपे,भारतीय जनता पार्टीचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष सुनील‌ कदम, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर कोले, ओबीसी सेलचे अध्यक्ष नंदकुमार मोरे व मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष भीमराव रावडे, सौमित्र परबत,शुभम पानसरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला. 
 
Top