शिवसेना माजी आमदार सुरेश गोरे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती ना. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली भावपूर्ण श्रद्धांजली...
पुणे,१०/१०/२०२० - शिवसेनेचे खेड मतदार संघातील माजी आमदार सुरेश गोरे ex mla Suresh gore यांचे आज धक्कादायक आणि अत्यंत दुःखद निधन झाले आहे. शिवसेनेच्यावतीने विधिमंडळातील त्यांच्या सहकारी विधान परिषद उपसभापती ना.डॉ.निलम गोऱ्हे nilam gorhe  यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. श्री सुरेश गोरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या सोबतच त्याअगोदर अनेक वर्षे समाज कार्य केले होते. जिल्हापरिषद, पंचायत समितीमधील अनेक पदे त्यांनी भूषविले होती इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात खेड तालुक्यात महिलांची जागृती करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. उत्तम चारित्र्य,लोकांशी भेटण्यासाठी संवेदनशील स्वभाव, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर तीव्र बांधिलकी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत पूर्णपणे वचनबद्धता, शिवसैनिकांबद्दल आधार अत्यंत वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व अशा मिलाफ त्यांच्या संपूर्ण कामात झालेला होता, अशा वाक्यात ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्री सुरेश गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या व्यवस्थेसाठी स्वतः लक्ष घातले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सातत्याने त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात संपर्कात होते. परंतु कोरोनाच्या गंभीर संकटासमोर त्यांचा मुकाबला होऊ शकला नाही आणि त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या कार्यामध्ये आम्हां सर्वांचेनंतर सुद्धा लक्ष राहील त्यांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त करून ना.डॉ.गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.
 
Top