पंढरपूर,(नागेश आदापूरे),२४/१०/२०२० - सोलापूर जिल्ह्याचे राजकीय,सामाजिक,सहकार क्षेत्रातील आधारवड कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त पांडूरंग परिवार युवक आघाडी,पंढरपूर यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


शनिवार दि.२४१०२०२० रोजी नंदयशोदा तालीम,गोपाळपूर रोड,येथे वृक्षारोपण,प्रभा हिरा प्रतिष्ठान,पालवी,कोर्टी येथे फळे वाटप,रामकृष्ण हरि वृध्दाश्रम,ठाकरे चौक येथे खिचडी व लाडू वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.


सर्व कार्यक्रम युवा नेते प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी नगरसेवक कृष्णा वाघमारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,श्री. घोडके,संग्रामसिंह परदेशी,गणेश दगडू धोत्रे,शैलेश आगावणे,बालाजी प्रक्षाळे,नवनाथ कांबळे,विष्णु सुरवसे,आनंद कासट,दादा भुसनर,तमीम सय्यद, आबा पवार,रवि गुरव,अविनाश देवमारे,विकी अभंगराव,प्रमोद धोत्रे,संदिप कळसुले,सुहास देवकुळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top