कुर्डुवाडी,(राहुल‌ धोका),१४/१०/२०२० - माढा तालुका ,कुर्डुवाडी शहर येथे आज सकाळी ९ वा पासून पावसास सुरवात झाली असुन दु ३.०० पर्यंत पाऊस चालुच होता. काल व दि १२ रोजी हि मोठा पाऊस झाला असून‌ क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली आहे मात्र या अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर आहे.कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. 
  माढा तालुक्यात अतिवुष्टी झाली असून द्राक्षे, फळबागा, कांदा,पालेभाज्या व सर्व पिकांची नासाडी झाली आहे. ज्वारीचे दुबार पेरणी संकट असुन तत्काळ पंचनामे करावेत -दिनेश गाडेकर , माढा -अध्यक्ष युवा आघाडी स्वाभिमानी‌ शेतकरी‌ संघटना
   कुर्डुवाडी शहरातील पाऊसामुळे सर्व व्यापार ठप्प असून आज सकाळपासून लाईट गुल आहे प्रशासकिय यंत्रणेने दक्षतेचा इशारा दिला मात्र प्रत्यक्ष पाहणी विज जोडणीची गरज आहे.छोट्या खेड्यात ,घराचे मोठे नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणावर झाडाची पडझड झाली‌ आहे.

कुर्डुवाडी शहरात गोलचाळ, मार्केट यार्ड, मार्कड वस्ती , परंडा रोड, गिताबाई चा माळा , सरकारी दावखाना आदि भागात पाणी शिरले त्यामुळे  प्रचंड नुकसान झाले आहे .नगरपरिषद जेसीपी च्या साह्याने पाण्यास वाट करून देण्याचा प्रयत्न करत आहे.अजुन हि बाहेरील भागतील ओढ्यातुन पाणी येत असल्याने प्रचंड घबराहट पसरली आहे.
 
   टेंभुर्णी रोड येथील इलेक्ट्रॉक पोल पडला असुन लाईट गुल आहे तर जिओ बीएसएनएल नेटवर्क हि गायब असल्याने प्रशासकिय संपर्क तुटला आहे.

रात्री पाऊस येईल या भितीने लोक सुरुक्षित जागा पाहत असुन मोठी आपत्ती आली असून गत बारा वर्षात प्रथमच एवढा पाऊस पडला आहे.

  कुर्डुवाडी येथे लिड स्कुलमध्ये ही पाणी शिरले असुन तेथे शिक्षक अडकून पडल्याची माहिती आली आहे यासाठी आपत्ती व्यवस्थापनशी संपर्क केला जात आहे.
 
Top