या परिवाराला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल

मुंबई,०६/१०/२०२०-उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित दलित युवतीच्या बुलगडी या गावातील घरी जाऊन तिच्या शोकाकुल परिवाराची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या परिवाराला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलीस संरक्षण देणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षातर्फे सांत्वनपर आर्थिक मदत देणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले आहे.


ना.रामदास आठवले दि.२ऑक्टोंबरला हाथरस जाणार होते मात्र तेथील जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी केली होती.प्रशासन विनंतीमुळे ना रामदास आठवले यांनी आपला दौरा बदलून लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली होती.
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती.

युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन तिला न्याय मिळवून देऊ

हाथरसमधील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ना रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली.
त्यात हाथरस प्रकरणात पीडित बळीत दलित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन तिला न्याय मिळवून देऊ , तिच्या कुटुंबियांना शहरात चांगले घर देणार, कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देणार ,२५ लाख रुपये सांत्वनपर निधी देणार तसेच या प्रकारणाची सीबीआयद्वारे चौकशी करणार,या प्रकरणात कारवाई कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी निलंबित केल्याची माहितीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ना.रामदास आठवले यांना दिली आहे.
 
Top