अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची सखोल चौकशी करून गुन्ह्यातील (हडपसर पोलिस स्टेशन FIR क्र १५४६/२०२० दि.३० ऑक्टोबर २०२०) आरोपीस तात्काळ अटक करण्यासाठी, सूचना देण्याबाबत गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य,अनिल देशमुख यांना विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे महाराष्ट्र,मुंबई यांनी विनंती केली आहे .

सामूहिक अत्याचाराची भयावह घटना 

पुणे,३१/१०/२०२० - पुणे शहरातील हडपसर भागामध्ये दि.३०/१०/२०२० रोजी अल्पवयीन मुलीवर (वय १५ वर्ष) सामूहिक अत्याचाराची भयावह घटना घडली आहे. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन,पुणे येथे FIR क्र १५४६ /२०२० दि.३० ऑक्टोबर २०२० नोंदवला आहे.
अत्याचार प्रकरणी अत्यंत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे कारण गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिलेला नाही. रत्यावरील दुकानांचे CC Camera रस्त्यावरील रहदारी रेकॉर्ड करु शकतील मात्र यासाठी राजकीय आणि पोलिस प्रशासनाला दुकानदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर पालक आणि पाल्यातील सुसंवाद असणे आवश्यक आहे .
सदरील मुलीचे घरेलू भांडण झाल्यामुळे ती रागाच्या भरात,घरामधून बाहेर पडली होती.रस्त्यावर एकटी उभी असलेली पाहून तिच्या नातेवाईकांची ओळख सांगून संबंधीत आरोपीने तिला निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर तीन मित्रांना फोन करून बोलावून घेवून त्यांनीही तिच्यावर सामुदायिक अत्याचार केला.सदरील मुलीने त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेबाबत माहिती दिली व त्यानंतर हा गंभीर गुन्हा समोर आला.

     मी या मुलीच्या कुटुंबियांशी बोलून विचारपूस केली आहे तसेच काही मदत लागल्यास तसेही कळवण्यास सांगितले आहे.हा निंदनीय प्रकार दिनांक ३०ऑक्टोबर २०२० रोजी घडला असून तपासी अधिकाऱ्याला खालील प्रमाणे सूचना देण्यात द्याव्यात

१) पुण्यात महानगरपालिका यांनी बसविलेले सीसीटीव्ही आणि लोकसहभागातून बसविण्यात येणाऱ्या 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांचे 'जिओ टॅगिंग' करण्यात आले आहे.त्याचे आँनलाईन सनियंत्रण पोलीस मुख्यालयातुन केले जाते.हडपसर भागा तील ही घटना घडत असतांना मुख्यालयातुन काय आँनलाईन देखरेख झाली व त्वरित त्याची दखल त्यावेळी कामावरील कर्मचारी यांनी काय घेतली याची चौकशी करुन त्याचा अहवाल माझ्या कार्यालयात माहितीस्तव देण्यात यावा जेणेकरुन ही यंत्रणा पुणे शहरात अधिक चांगली व उपयुक्त ठरेल.

२) सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना तपासी अधिकारी यांना द्याव्यात.

३) आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करावी.

४) या घटनेचा तपास कमीत कमी वेळात करून चार्जशीट न्यायालयात दाखल करावे.

५) आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत.

६) मुलीचे व परिवाराचे समुपदेशन करण्यात यावे.
 यासाठी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी विनंती गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य,अनिल देशमुख यांना विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे महाराष्ट्र,मुंबई यांनी केली आहे .               
 
Top