शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

पंढरपूर,प्रतिनिधी,२२/१०/२०२० - शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने करण्यात आली.

कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील व सौ मंगल कडूस पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा कृषी पदवीधर संघटनेच्या जिल्हा युवती कार्याध्यक्ष अभिलाषा पाटील, जिल्हा विद्यार्थी संघटक ज्ञानेश्वर कदम, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर,तालुका युवक अध्यक्ष अनिल काशीद,विद्यार्थी अध्यक्ष शुभम यादव, विद्यार्थी उपाध्यक्ष शिवम शेंडे यांनी या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी पवार व सहाय्यक खरात यांच्याकडे सादर केली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे त्यास आर्थिक मदत देणे गरजेचे असून तातडीने पंचनामे करून तातडीची मदत शेतकऱ्याला मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
 
Top