पंढरपूर नगरपरिषदेमार्फत 'स्वच्छता हिच सेवा' सप्ताह
यावेळी सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक शिपाई , मुकादम, इतर कर्मचारी यांनी या सप्ताहामध्ये सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार सभापती विवेक परदेशी यांनी मानले व त्यांचेवतीने सर्व सफाई कर्मचारी यांना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी सध्या मलेरिया व डेंगूची साथ असल्याने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आपल्या घर परिसरातील भंगार, टायर,कुंड्या,फ्रिज,कुलर याची नियमित तपासणी करावी, कोणीही रत्यावर कचरा टाकु नये.तो घंटागाडीतच टाकावा,शहर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी व यापुढेही सेवा, स्वच्छतेसारखे उपक्रम राबवु असे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.
शहर स्वच्छ व कोरोनामुक्त राहील याकडे लक्ष देऊ - नगराध्यक्षा साधनाताई भोसले
कोरोनाच्या लढाईत आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलेले आहे यापुढे सुद्धा असेच सहकार्य करून शहर स्वच्छ व कोरोना मुक्त राहील याकडे लक्ष देऊया असे नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांनी सांगितले.
या स्वच्छता सप्ताह सांगता समारोप प्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले,नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव , उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य सभापती विवेक परदेशी, नगरसेविका शकुंतला नडगीरे,नगरसेवक कृष्णा वाघमारे, भागवत बडवे, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर आदी उपस्थित होते.