अन्नपचनास्तव पित्ताची गरज

   आपल्या शरीरात पित्ताची निर्मिती यकृतात होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी पिशवी म्हणजे पित्ताशय (Gall Bladder) हे फुग्याच्या आकाराचे असते. पित्ताशय हे जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवते व प्रत्येक जेवणा वेळी ते पित्तनलिकेमार्फत लहान आतड्यात सोडते. अन्नपचनास्तव पित्ताची गरज असते. जेवणानंतर पचनक्रियेस्तव ठराविक कालावधीत पित्त हे आवश्यकतेनुसार लहान आतड्यात सोडले जाते.तिखट आंबट सेवनाने भुख वाढते, पित्त निर्मिती होते. मात्र गोड खाण्याने पित्त व भुख दोन्ही शमते.

पित्ताशयात खडे होण्याची कारणें -

       आहारात स्निग्ध पदार्थाचे (Oily Food) प्रमाण जास्त झाले किंवा तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी झाले तर पित्ताची घनता वाढून पित्ताचे खडे पित्ताशयात होतात.

        ॲलोपॅथी च्या पित्तशामक गोळ्यांचे सेवनाने पित्ताशयात खडे निर्माण होतात.

         अवेळी भोजन, जिभेचे चोचले,बेकरीतील पदार्थांचे सेवन, कुपोषण, अतिउपोषण यामुळे पित्ताशयात खडे निर्माण होतात.

घरगुती औषधे -

 आंबा पानांचे चुर्ण उकळून मधाबरोबर खाणे.
  बाटी भाजून सुपारीएवढा तुकडा दररोज खाणे.
  धने-जिरे-खडीसाखर गरम पाण्यात भिजवून ३० मिनिटांनी वस्त्रगाळ करुन पिणे.
 मनुका खाणे.
 मुळा खाणे,मात्र मुतखडा असल्यास खाऊ नये. लाल मुळा उत्तम
 पित्त शमविण्यारे गोळ्यांमुळे पित्ताचे खडे होतात.
 सफरचंद,हळद,एरंडेल,गोखरु,मध,तूप यांचे सेवन प्रकृती स्वास्थ्यास पुरक ठरते.
 वरुणाद्य घृत(साजूक तूप) दोन चमचे पाण्यात सकाळी संध्याकाळी
  काळ्या तुळशीचा रस दोन चमचे दोनदा
  कुमारी आसव.नं २ चमचे आधिक पाणी दोन चमचे दोनदा.
 कडुलिंब रसाचे सेवनाने पित्ताचे खडे विरघळतात.

         बाराक्षार पध्दत 

  सिलिशिया१२×चार चार गोळ्या. दिवसात तीन वेळा खडे विरघळतात.
 कँल्कर फाँस ३×चार चार गोळ्या तीन वेळा खडे पडतात.

वरील उपाययोजना केल्यास खात्रीपूर्वक साईड इफेक्ट्स होत नाहीत.

संदर्भ:- १)वैकल्पिक साहित्य २)वैज्ञानिक अंधश्रद्धा निर्मुलन काळाची गरज, 
संपादक राधेश बादले पाटील,साप्ताहिक राष्ट्रसंत पंढरपूर


 
Top