पुरपरिस्थितीशी मुकाबला करीत असताना, कोरोना संकटावरही करायची आहे मात- विवेक परदेशी,आरोग्य सभापती
  

 पंढरपूर, १६/१०/२०२०- पंढरपूर शहरात उजनी व विर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात बरेच भागात पाणी आले आहे. गत वर्षी ही पुर आला होता पण या वर्षी पुरपरिस्थिती बरोबर कोरोनाच्या संकटावरही मात करावयाची आहे. या वर्षी पंढरपूर शहरात ७०० ते ८०० कुटुबांना सुरक्षित ठिकाणी शाळा,मठ,रेल्वे स्टेशन,बस स्थानकमध्ये स्थलांतर केले आहे. नागरिकांमधे कोरोनाविषयी भिती कमी होत आहे ही चांगली गोष्ट आहे. घाबरुन कोरोनापासुन बचाव होणारच नाही परंतु जागरुक राहणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे,मास्क वापरणे,वरचेवर हात धुणे व लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाणे, टेस्ट करुन घेणे. जरी कोरोना पॉझिटीव्ह आलो तरी औषध उपचार घेऊन लवकर कोरोनामुक्त होऊन दैनंदिन कामाला लागु शकतो.


     पुरपरिस्थितीमुळे नागरिकांना कोरोना नाहीच असे वाटत आहे.कोरोनाचा विसर पडत असल्याचे जाणवत आहे. कोरोनाला विसरुन, दुर्लक्ष करुन चालणारच नाही.पुर्ण जगभरात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे.थोडेसे दुर्लक्ष आपणास महागात पडु शकते . नागरिकांनी आता मोठ्या प्रमाणावर मास्क वापरणे सोडून दिले आहे.  

           या दोन्ही संकटावर मात करायची आहे

   आपणास कोरोना विरुद्ध कसे लढायचे याची माहिती दिली आहे. नागरिकांनी व प्रशासनानी घेतलेल्या काळजीमुळे आपल्या तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचा वेग कमी झाला आहे.या पुर परिस्थितीशी मुकाबला करीताना, कोरोना वाढणार नाही याकडेही सर्वांनी लक्ष द्यायचे आहे ,काळजी घ्यायची आहे. या दोन्ही संकटावर मात करायची आहे ,असे आवाहन आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी केले आहे .
 
Top