महसूल प्रशासन व नगरपरिषदेच्यावतीने

पंढरपूर, १९/१०/२०२० - पंढरपूर शहरांमध्ये नुकताच पूर येऊन गेला आहे .ज्या भागात पुराचे पाणी आले होते त्या ठिकाणी महसूल प्रशासन व नगरपरिषदेच्यावतीने ज्या घरांमध्ये पुराचे पाणी आले होते त्या घरांच्या पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, झोनल ऑफिसर चिदानंद सर्वगोड, पंढरपूर सर्कल वाघमारे यांनी समक्ष सर्व्हे चालू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन सर्व्हेचे काम योग्य रीतीने चालू आहे किंवा नाही याची पाहणी व तपासणी केली. ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले आहे असे कोणतेही घर सर्व्हेमधून राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.


यावेळी या प्रभागाचे नगरसेवक सुजित सर्वगोड व माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम बोहरी यांनी या भागातील नागरिकांच्या अडचणी मांडल्या.
 
Top