एकही पूरग्रस्त नुकसानग्रस्त पंचनाम्यांपासून वंचित राहता कामा नये - आमदार भारत भालके यांच्या प्रशासन प्रमुखांना सूचना
  नुकसानग्रस्त पंचनाम्यांपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घ्या
पंढरपूर,२२/१०/२०२०- उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूर आला होता. यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे तात्काळ करावे अशा सूचना सोलापूर येथे पाहणी दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. यानंतर पंढरपूर शहरासह तालुक्यात नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे व शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.याची पाहणी करण्यासाठी आमदार भारत भालके हे पंढरपूर शहरातील आंबेडकरनगर परिसरात आल्यानंतर प्रशासन प्रमुखांना फोनद्वारे संपर्क करून पूरबाधित एकही नागरिक नुकसानग्रस्त पंचनाम्यांपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

  गेली पाच दिवसांपासून आंबेडकरनगर परिसरात पंचनामे सुरू आहेत.मात्र एकच टीम या भागातील पंचनामे करण्यासाठी पाठविण्यात आल्याने येथील नागरिकांना नुकसानग्रस्त पंचनाम्यांसाठी पाच दिवसांपासून वाट पाहावी लागत आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे करणा-या टिम वाढवून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी पुरग्रस्त नागरिकांनी आमदार भालके यांच्याकडे केली आहे.
 
Top