कसबा पेठ पुणे येथील युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांचा झालेला खुनाच्या मागे असणाऱ्या सर्वांचा शोध घ्यावा व आरोपींना मोक्का लावा- डॉ नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
पुणे, ०२/१०/२०२० - युवा सेनेचे कसबा विधानसभा, पुणे मतदार संघातील दिपक विजय मारटकर यांच्यावर दि २ ऑक्टोबर २०२० च्या रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने खून केला आहे.


या घटनेबाबत दीपक मारटकर यांच्या सर्व खुन्यांना तात्काळ अटक करावी. हे सर्व खुनी सराईत आहेत का ? त्याअनुषंगानेही पोलीस चौकशी करावी,असे लेखी निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिल्याचे असे डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी सांगितले.

या खुनाबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 1094/2020 भादवि कलम 302,143,144, 147, 148,149, 37(1),135 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात यावेत अशीही विनंती करणेत आली असलेचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले. .

   मारेकरी पळून जाताना त्या भागातील CCTV फुटेज तात्काळ उपलब्ध करून घ्यावेत.सर्व खुनी व्यक्तींना तात्काळ अटक करावी. या खुनामागे कोणी सूत्रधार आहेत का याचाही शोध घ्यावा.खून केलेल्याना जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कोठडी मागावी.खुनी व्यक्तीं ह्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का हे तपासून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. या खुनी व्यक्तींना ज्यास्तीत जास्त शिक्षा होईल हे पाहावे.तपास व चार्जशीट कार्यक्षम व काटेकोरपणे व्हावा. या प्रमाणे संबंधीत पोलीस आयुक्त यांना सूचना देणेत याव्यात अशी विनंती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केली आहे.
 
Top