सायकल रॅलीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची जनजागृती



पंढरपूर ,१२/१०/२०२०- रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत व्हर्च्युअल सायकल रॅलीच्या माध्यमातून माझी कुटुंब माझी जबाबदारी या योजनेची जनजागृती करण्यात आली.सहभागी सायकलस्वारांना जनजागृतीपर टी शर्ट देण्यात आले होते . पंढरपूर सायकल क्लबने नोंदणी केलेल्या सदस्यांना टी शर्टचे वितरण केले.सायकल रॅलीच्या सुरुवाती पासून वेळसंपेपर्यंत नियंत्रण केले.सदर टी शर्टवर माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा लोगो, माहीती व कोरोनाच्या कालावधीमध्ये घ्यावयाची त्रिसुत्री काळजी याचे छायाचित्र छापण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्ती मध्ये सुरक्षीत अंतर ठेवणे , वरचेवर हाथ धुणे, मास्कचा वापर करणे असा त्रिसूत्री संदेश देण्यात आला.


या रॅलीमध्ये सहभागी १५० सायकलस्वारांना रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या आवडीचा मार्ग व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामध्ये प्रदक्षणा मार्ग, शिवाजी चौक ते पंढरपूर गाव प्रदक्षणा, ठाकरे चौक ते कोर्टी गाव, ठाकरे चौक ते गादेगाव ते इसबावी, पंढरपूर कॉलेज चौक ते वाखरी गाव, सांगोला नाका ते टाकळी रोड ते रेल्वे स्टेशन, सांगोला चौक ते खर्डी गाव, माळे वस्ती ते टाकळी गाव ते सोनके तिसंगी, अर्बन बँक ते भक्ती सागर ६५ एकर परिसर असे विविध मार्ग निवडले.


      कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रोग प्रतिकारकशक्ती चांगली असणे गरजेचे आहे.यासाठी व्यायाम, प्राणायाम, मेडीटेशन, सकस आहार या गोष्टीचा दररोज अवलंब करणे गरजेचे आहे.आज बरेच नागरिक सकाळी सायकलींग करत असताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये वाढती सायकलची आवड पाहता आनंद वाटत असल्याचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. या व्हर्च्युअल सायकल रँलीच्या माध्यमातून आपले दोन्ही उद्देश साध्य होत आहेत गाडीऐवजी शक्य त्यावेळी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.

       माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना महत्वाची असून,आपल्या कुटुंबाची काळजी आपण घ्यायची आहे. पंढरपूर तालुक्यातील ४ लाख ४७ हजार ३०० नागरिकांची तपासणी केली आहे.सर्दी,ताप , खोकला,वास न येणे,चव न येणे,कणकणी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असल्यास त्वरित शासन प्रतिनिधी व डॉक्टरांशी संपर्क साधावा, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होणार आहे त्यामुळे प्रशासनाला, आरोग्य विभागाला, फिल्डवर काम करणाऱ्या शासन प्रतिनिधींना, आशा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी केली.
 
Top