डॉ शीतल पाटील व डॉ.सौ.संगीताताई पाटील यांचे कार्य कौतुकास्पद

पंढरपूर ,०२/१०/२०२०- Covid Warrior डॉ.शीतल पाटील व डॉ. संगीता पाटील यांचा आ. भारत भालके यांनी महाराष्ट्र वीरशैव सभा या संघटनेच्यावतीने सन्मान केला.

कोरोनारुपी संकट ओढवल्यापासुन बहुसंख्य नागरिक हे प्रचंड दडपणाखाली वावरत आहेत व त्यातच डॉक्टर्स, हॉस्पिटल व्यवस्थापन याबाबत सातत्याने नकारात्मक चर्चा कानावर पडत असते. परंतु सरसकट सर्वच डॉक्टरांना बदनाम करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्वार्थाने बरबटलेल्या काही व्यक्ती या असतातच. त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनाशी लढताना समाजातील अनेक घटकांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे. वास्तविक पाहता या लढ्यात सर्वात महत्वाची भुमिका कोणाची असेल तर ती डॉक्टरांचीच, हे आपल्या सर्वांना मान्यच करावे लागेल.

पंढरपूर शहरात देखील डॉक्टर्स हे त्यांच्यापरीने सर्वोतपरी कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य हे प्रशंसनीय आहेच. तथापि डॉ शीतल पाटील व त्यांच्या सुवीद्य पत्नी डॉ.सौ.संगीताताई पाटील यांचे कार्य हे विशेषतत्वाने कौतुक करण्यासारखे आहे. स्वतःचा खाजगी दवाखाना संभाळत गेल्या सहा महिन्यांपासून सामाजिक बांधिलकी जपत अगदी नि:शुल्क सेवा देण्याचे काम हे डॉ.पाटील दाम्पत्य करत आहे. कोरोनाबाधित Home isolate रुग्णांच्या घरोघरी जावून सेवाभावी वृत्तीने उपचार करीत आहेत.आजमितीस डॉ. पाटील दाम्पत्याने तब्बल २६१ Home isolate पेशंटवर पुर्णपणे मोफत उपचार करत आहेत.

डॉ.पाटील दाम्पत्याची इतरांनी प्रेरणा घ्यावी - आ.भारत भालके

  डॉ.पाटील दाम्पत्य व त्यांच्या टीमच्या कार्याला उजाळा मिळावा इतरांनीही यातुन प्रेरणा घ्यावी, या हेतूने महाराष्ट्र वीरशैव सभा या संघटनेच्या वतीने त्यांचा आ.भारत भालके यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

  आ.भारत भालके यांनी डॉ. पाटील दाम्पत्य व त्यांच्या टिमची आस्थेने चौकशी करत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. Covid warrior म्हणून कार्यरत असताना जे काही वैद्यकीय साहित्य हवे असेल, ते त्वरीत उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली. 

    याप्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे, वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष सुरज पावले, विठ्ठल सह.सा.का.चे संचालक दिनकर पाटील, रेखा चंद्रराव, संध्या राखी, तुकाराम खंदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top