राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांवर पोहोचले

मुंबई,०७/१०/२०२० - राज्यात सर्वाधिक ५८,८६८ सक्रिय रुग्ण पुण्यात असून ठाण्यात ३१,००९ तर मुंबईत २६,००३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात येत असून, दिवसागणिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यात सध्या २ लाख ४७ हजार २३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी राज्यात २ लाख ५२ हजार २७७, रविवारी २ लाख ५५ हजार २८१ तर शनिवारी २ लाख ५८ हजार १०८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली.

आतापर्यंत ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोविडमुक्त

  राज्यात मंगळवारी १२ हजार २५८ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३७० बळी गेले. कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ३८ हजार ७२७ आहे.दिवसभरात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
 
Top