ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुरू करून किमान वेतनाचा फरक देण्याबाबत ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आयुक्तांना सूचना
पुणे,दि.३०/१०/२०२०- ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर नगरपालिका यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे व किमान वेतनाचा फरक देण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने दुरदृश्य प्रणालीद्वारे दि.२९ ऑक्टोबर,२०२० महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली.

यामध्ये ना.डॉ.गोऱ्हे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून त्यांचा फरकही तात्काळ देण्यात यावा. तसेच सामाजिक न्याय विभागाची सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी सर्व नगरपालिका व महानगरपालिका यांच्यामध्ये राबवावी अशा सूचना महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या.

या विषयाबाबतची मागणी कामगार नेते मिलिंद रानडे यांची

या विषयाबाबतची मागणी कामगार नेते मिलिंद रानडे यांनी उपसभापती यांना लेखी पत्राद्वारे केली होते. त्यानुसार सादर बैठक आयोजित करण्यात आली होती.श्री रानडे यांनी १४०० सफाई कर्मचारी,२५० ड्राइवर यांना किमान वेतना प्रमाणे पगार द्यावा,प्रलंबित एकरकमी फरक द्यावा,कामगारांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखे पर्यंत पगार द्यावा व आवश्यक सुरक्षा रक्षक साहित्य द्यावे आशा मागण्या मांडल्या.

या दुरदृश्य प्रणालीद्वारेच्या बैठकीस महापौर नरेश मस्के,नगर विकासचे प्रधान सचिव महेश पाठक ,ठाणे महानगरपालिका आयुक्त बिपिन शर्मा,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे हजर होते. 

    यावेळी आयुक्त ठाणे यांनी किमान वेतनाचा फरक फेब्रुवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१६ देण्या संदर्भात श्री म्हस्के महापौर यांनी सूचना दिल्या आहेत. हा फरक पाच हप्त्यात देण्यात येणार आहे.यापैकी दोन हप्ते यापूर्वीच देण्यात आलेले असून डिसेंबर २०२० पूर्वी तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. उर्वरित दोन हप्ते २०२१ मध्ये देण्यात येतील असे सांगितले.एकूण १७ कोटी रुपये प्रलंबित देणे असून प्रत्येक हप्ता हा ५.५० कोटींचा आहे असे त्यांनी सांगितले. 

  श्री म्हस्के महापौर ठाणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत संरक्षण किट देण्यात येत असून प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासंदर्भात प्रशासनास सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
   
     ना.डॉ. गोऱ्हे यांनी नगरपालिका व महानगर पालिका यांच्याकडील प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत संरक्षण साहित्य द्यावे. त्यांची वैद्यकीय तपासणी वेळेवर करावी. तसेच केंद्र सरकारच्या सफाई कामगारांच्यासाठी असणाऱ्या योजनेचा लाभ घेणेसाठी राज्यात शहरी स्थानिक संस्था मध्ये किती सफाई कर्मचारी आहेत याबाबत माहिती गोळा करावी व सामाजिक न्याय विभागा बरोबर सविस्तर बैठक घेऊन ह्या योजनेचा लाभ या सफाई कर्मचाऱ्यांना कसा होईल हे पाहावे असे निर्देश प्रधान सचिव नगर विकास यांना डॉ गोऱ्हे यांनी दिले.
 
Top