येत्या काही वर्षांत "आयुष" जगात मुख्य प्रवाहातील उपचार प्रणाली म्हणून स्वीकाहार्य होईल-केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
पणजी,२५ ऑक्‍टोबर २०२०,PIB Mumbai-
पारंपरिक भारतीय औषधोपचार पध्दतीला हजारो वर्षांचा इतिहास असला तरी ती दुर्लक्षित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आयुषला आपले सोन्याचे दिवस परत मिळत असुन आयुर्वेदाला जगाच्या नकाशावर परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केले.स्थापनेनंतरच्या केवळ पाच सहा वर्षांत आयुषने स्वतःला जगभरात प्रस्थापित केले, असे आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. ते आज धवळी -पोंडा येथे माधवबाग आणि वेदिक डीलाईट आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

परदेशस्थ भारतीय नागरिक आयोगाचे आयुक्त अँड. नरेंद्र सवाईकर ही यावेळी उपस्थित होते.

भारताची जागतिक कल्याणकारी संकल्पना आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून लक्षात येईल

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले,की आयुष ही पर्यायी वैद्यकीय उपचार पद्धती आहे.हे चित्र लवकरच बदलेल आणि पारंपरिक आयुष वैद्यकीय उपचार हे जगभरात उपचार मुख्य प्रवाहाशी संलग्न उपचार म्हणून स्विकारले जातील. सामान्य माणसाला कमी खर्चात उत्तम उपचार उपलब्ध करणे, ही स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यामागची संकल्पना असुन आपण कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत आहोत. या परीक्षेच्या काळात आपल्याला प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात आले.आयुर्वेद आणि योग प्रतिकार शक्ती वाढवितात हे स्विकारले गेले आहे.


एका दुसऱ्या समारंभात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा शेती उत्पादने आणि पशुधन बाजाराचे उदघाटन केले.त्यांनी गोवा राज्य सरकारच्या कार्याचे गोवा राज्याला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
 
Top