याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले

  पंढरपूर,१३/१०/२०२०- जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कालावधीत काही बँका,वित्तीय संस्था,बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्ज वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या.भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत शेती, छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यवसाय, दळणवळण, व्यवहार बंद होते. अद्यापही अनेक व्यवसाय बंद आहेत. या काळातील मंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकार, रिझर्व बँकेने कर्जाच्या हप्ते वसुलीला सूट दिली होती. मात्र काही बँका,वित्तीय संस्था,बचत गट कर्जदारांना तगादा लावून वसुली करीत आहेत. बँकांनी,वित्तीय संस्थांनी, बचत गटांनी वसुली साठी तगादा लावणे, बळाचा वापर करणे,धमकावणे असे प्रकार करून कर्जवसुली करू नये यासाठी त्यावर निर्बंध आणण्या साठी अग्रणी बँकेने जिल्ह्यातील राष्ट्रीय, वाणिज्य, सहकारी बँका, वित्तीय संस्था यांच्या वरिष्ठांची बैठक घेऊन सक्त सूचना कराव्यात असे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून या कर्ज वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली असून बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक ठिकाणी मोर्चे काढून बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेना प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे बचतगटांच्या महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कर्जदारांना मानसिक आणि शारिरीक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत,यासाठी उपाय योजना कराव्यात म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या या आदेशामुळे महिला बचत गटांना दिलासा मिळणार आहे.
 
Top