माय नेम इज टुडे
:

आम्ही जयंत्त्या पुण्यतिथ्या
साजरे करण्यात तरबेज आहोत
महात्म्यांचा पराभव करण्यात अधिक तरबेज आहोत !!१!!

भाषणे ठोकण्यात आम्ही एकच नंबर आहोत
हे जगजाहीर आहे
कोणी कितीही सूचित केले तरी आम्ही
आहे तसेच आहोत !!२!!

मुखात आमच्या राम आहे
कामात मात्र नथुराम आहे
कोणीही असो आम्ही
आमच्याच नादात बेफिकीर आहोत !!३!!

आई बाप मातोश्री आश्रमात 
मुले व्यसनात सर्वत्र अंधार आहे 
शिक्षण घेऊनही येथे नवी पिढी संस्कारशून्य 
नीतीचा पंचनामा आहे !!४! 

टोलनाका:

नाथाभाऊ आता, साहेबांचे कळपात नव्या दमात
नागपूर सुटलं , बारामती गाठलं 
वनवास नव्हे, आता मंत्रीपद टकुऱ्यात 
म्हणून भाऊ आता तोऱ्यात 
जे निषेधाला तेच ,आता स्वागताला
हाच चमत्कार आहे म्हणूनच 
साहेबांना नमस्कार आहे 
नाथाभाऊ आता नव्या स्वप्नांत
एकाच दमात कमळ कोमात ,घड्याळ जोरात"!!


आनंद कोठडीया,जेऊर 
९४०४६९२२००


 
Top