तिसरा डोळा :

कोणास निवडावे प्रश्न भेडसावतो आहे
विश्वासालाच बळी देवून जो तो लढतो आहे !!

त्यांचे जाहिरनामें वचने शब्द सारे खोटे आहेत
गरजेपुरते मतदार एरव्ही ठेकेदारांचाच राबता आहे !!

मतदानापर्यंत विनयशिल जिंकताच उद्धट होतात
कामासाठी ते फक्त आर्थिक व्यवहार करतात !!

सत्तेवर येताच मतदारांना विसरतात
देणे घेणे महत्वाचे भवितव्य वारसदाराचे पहातात !!

कोठेही असो गरजेनुसार पक्षांतर् त्यांचा गुण आहे
कसेही असोत सत्तेत तेच संधीसाधुन्चाच शाप आहे !!


टोपीखाली दडलंय काय?



अर्ज काढून इतरांना पाठींबा देताना
मतदारांच्या संशयाच वादळ
पारावर चर्चेत घुमते आहे 
खरं कोण खोटं कोण
राजकारणात सारेच खपते आहे 
निवडणुकीत मोडीत निघालेल्यांचे 
देखील दुकान चालते आहे "!!

आनंद कोठडीया,
८६०५६३८१४९


 
Top