मी स्वतःला शहाणा समजत होतो तेच चुकले होते
यामुळेच माझी वाट चुकली हे मात्र खरे होते !!१!!
अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कांन टोचले होते
मी माझ्याच धुंदीत कोणालाच जुमानले नव्हतें !!२!!
जाईल तिथे मीच मोठा हेच चुकले होते
इतरांना कमी लेखणे हेच नडले होते!!३!!
गर्व मी पणा शिखरावर अहंकाराने झपाटले होते
यातच मी बुडतो आहे हे अखेरीस समजले होतेच !!४!!
मात्र गुरूंना वंदन करून नवे जीवन जगतो आहे
आता माझा मीच मलाच लाजतो आहे !!५!!
आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००