सत्तेसाठी कायपण हाच व्यवहार आहे !!१!!
सविंधानाची ऐशी तैशी,जो तो आपलं पाहतो आहे
नीती अनीती पायाखाली,जो तो आपलाच पेंद्या शोधतो आहे !!२!!
सूर्य उगवूनही अंधार आहे
ज्ञानी अज्ञानी गौण,होयबाना प्रधान्य आहे !!३!!
यादी त्यांच्या मनांत आहे,
रानांत फक्त राजकीय तण आहे
बोलणं तयांचे फसवे पीक आहे!!४!!
ते म्हणजे चांदण नव्हे काजवे नव्हेत
तो व्यवहार आहे कोठेही जा हाच अनुभव खरा आहे !!५!!
पंचनामा......
कोण कोण यादीत,सारेच गोपनीय आहे
सिनेसृष्टीतील नटी ही आहे असं ऐकतो आहे
अखेरीस हे सत्तेचे राजकारण आहे
आता सिने नायिका येथे घुसत आहेत
निष्ठावंत मात्र कुजत आहेत
नेते देखील नटत आहेत
सराईत सत्तेसाठी मिळेल तसं चाटत आहेत !!
आनंद कोठडीया,
९४०४६९२२००