सत्ता यंत्रणा त्यांचेच दावणीला नीतीला स्थान नाही!!१!!
जाईल तिथे त्यांचीच भरती सज्जनास प्रवेश नाही
त्यांच्या विश्वात सोमरसच अमृत,दुसरं चालतच नाही!!२!!
सूर्योदयापूर्वी त्यांचा भ्रष्टाचार सुरू होतो,कोणासही विधिनिषेध नाही
कोठेही जा पाळसाला पानं तीनच,हे कांही खोटं नाही!!३!!
त्यांची युती नव्हे पाती प्रबळ आहे,कोणाचीही त्यांना पर्वा नाही
संविधान असूनही ते मुक्त कोणासही लाज नाही!!४!!
चौकाशीपूर्वीच त्यांना क्लीनचिट,अहवाल नाममात्र अर्थ नाही
कितीही आरडाओरडा केला तरी त्यांना गुंजभरही फरक नाही!!५!!
आनंद कोठडीया,
९४०४६९२२००