केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले- प्रशासनाने नुकसान ग्रस्तभागांचे तात्काळ पंचनामे करावे

पंढरपूर, दि.२२/१०/२०२०- अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटावरील कोसळलेल्या संरक्षित भितींची पाहणी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

   अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा सोडण्यात आला होता. या नदी काठी पूरपस्थिती निर्माण झाली होती. शेत पिकांच्या नुकसानी बरोबरोच घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाने नुकसान ग्रस्तभागांचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या


  तसेच कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्या मुळे मरण पावलेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी घेऊन केंद्र शासनामार्फत मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

   यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, नगरसेवक,पदाधिकारी,रिपाई शहराध्यक्ष संतोष पवार,जितेंद्र बनसोडे,सुनील सर्वगोड,किर्तीपाल सर्वगोड,बाळासाहेब कसबे,दिपक चंदनशिवे आदी उपस्थित होते.

    पूर परिस्थितीमुळे पंढरपूर तालुक्यातील झालेल्या नुकसानीची माहिती तसेच नदीवरील बांधण्यात आलेल्या घाटासंबधित माहिती तसेच कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे करण्यात आलेल्या कार्यवाहींची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली.
 
Top