नवी दिल्ली,१५/१०/२०२०- केंद्र सरकारने LTC बद्दलचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी एलटीसीमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कॅश व्हाउचर्स देण्याची योजना आखली आहे. या कॅश व्हाउचरच्या मदतीने कर्मचाऱ्यांना नॉन फूड वस्तू खरेदी करता येणार आहेत.ज्यावर जीएसटी किमान 12 टक्के असणार आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना LTA/LAC च्या रकमेतून ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना करसवलतही मिळणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही या करामध्ये फायदा होईल. त्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून लवकरच त्याची माहिती दिली जाईल. या योजनेच्या माध्यमातून सरकारला कोरोनामुळे पडलेल्या अर्थव्यवस्थेत उभारी देण्यासाठी ग्राहकांची मागणी वाढवायची आहे.
 
Top