भाजप खासदार रवी किशन यांना वाय + दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली - चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर ती आत्महत्या का हत्या याची चर्चा सुरू झाली.त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना ड्रग्जच्या मुद्द्यावरून चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ माजली कारण या ड्रग्ज प्रकरणी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आली.त्यावेळी हा प्रश्न संसदेत उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन bjp mp ravikisan यांना वाय + दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी रविकिशन यांनी स्वत: याबाबत माहिती दिली.

कदाचित ती मुलगीही संसदेची खासदार असती तर ?

युपी प्रशासनाने एका खासदाराला वाय + सुरक्षा दिली.पण हाथरसच्या पिडीत मुलीच्या उपचारासाठी युपी प्रशासन काहीही करू शकले नाही. कदाचित ती मुलगीही संसदेची खासदार असती तर ? असे ट्वीट आम आदमी पक्षाने आपल्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट करत म्हंटले आहे.

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही जोरदार निदर्शने सुरू केली असून उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
 
Top