पाचव्या जागतिक काँग्रेस आपत्ती परिषदेचे आयोजन दिल्ली येथे

अलिबाग - दिल्ली एमआयटी येथे होणाऱ्या पाचव्या जागतिक काँग्रेस आपत्ती परिषदेचे आयोजन दिल्ली येथे ९ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२० ला करण्यात आले असून या परिषदेमध्ये कोवीड १९ नंतर जनतेने काय केले पाहिजे या विषयावर जगातील आपत्ती व सुरक्षा विषयक कार्य करणाऱ्यांकडून लेख मागविण्यात आले होते. त्यामध्ये रायगड भूषण जयपाल पाटील, आपत्ती व सुरक्षा तज्ञ यांचा १३८ क्रमांकाचा लेख मंजूर करण्यात आला असल्याचे पत्र पाचव्या जागतिक काँग्रेस आपत्ती परिषदेचे संयोजक डॉ. आनंद बाबू यांनी पाठविले आहे.
२०१९ ला चौथ्या जागतिक परिषदेत मुंबई येथे सहभागी होते
तसेच तो लेख विस्‍तृत करुन पाठवावा असे पत्रही जयपाल पाटील यांना प्राप्त झाले आहे. जयपाल पाटील यांनी आजवर ३५१ व्याख्यानाद्वारे संपूर्ण देशभरात १ लाखाहून अधिक नागरिकांना आपत्ती सुरक्षा विषयक प्रशिक्षण दिले आहे.आकाशवाणी मुंबई,सोलापूर,रत्नागिरीवर व्याखाने दिली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ५० हजार नागरिकांनाही प्रशिक्षण दिल्यानेच त्यांना रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.२०१९ ला चौथ्या जागतिक परिषदेत आयटी मुंबई येथे ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी दोन चाकी मोटरसायकल अपघातावरील लेख लिहिला होता.

जिल्हाधिकारी रायगड यांनी रायगड जिल्हा प्रतिसाद दल सदस्य म्हणून त्यांची निवड केली. तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व आताच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ९७ हजार विद्यार्थी व ६२०० शिक्षकांना हे महत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास माजी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी ५० हजार रुपयांचे अनुदान रायगडचा युवक फाउंडेशनला मंजूर केले असून हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रायगड आपत्ती प्रतिसाद दलातर्फे करावा असे सांगितले आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला प्रकल्प केला जाणार आहे. या निवडीबद्दल जयपाल पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
 
Top