पंढरपूरसाठी महापुरात न बुडणारे ४ पुल करण्याची पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी
पंढरपूर,(प्रतिनिधी),१८/१०/२०२०- सतत छोट्या मोठ्या पुरामुळे पुलांवर येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे, मात्र रेल्वेपुल हा नॅरोगेजचा ब्राॅडगेज झाला तरीसुद्धा कधीही कोणत्याही महापुरात पाण्या खाली गेला नाही वा या ब्रिटीशकालीन रेल्वेपुलाची किंचितही हानी झाली नाही. आता पुलावर आलेल्या पुराच्या पाण्याच्या पार्श्वभुमीवर पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वस्तुस्थितीची जाणीव करुन देऊन, पंढरपूरला ४ पुलांची मागणी केली. जेणेकरुन साडेतीन लाख क्युसेक्स पाणी आले तरी हे पुल पाण्याखाली जाणार नाहीत, याबाबत अहवाल सादर करुन नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबंधितांना दिले आहेत.
रेल्वे ओव्हर ब्रिजची अत्यंत गरज असून पावसाळ्यात पंढरपूर शहराचे दोन भाग होतात. अनेक वेळा त्या पाण्यात वाहने अडकून जिवीत हानीचे धोका निर्माण होऊ शकतो. ही मागणी खूप वर्षांपासून प्रलंबित असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
पंढरपूर शहरात थोडा जरी पाऊस पडला तरी पंढरपूरातील मुख्य दोन रस्त्यांवरील रेल्वेब्रीज खाली पाणी साठून वाहतूक व्यवस्था व रहदारी पुर्णत: कोलमडते , यामुळे याठिकाणी ओव्हर ब्रीजची गरज आहे.तसेच यमाई-तुकाई तलावा खाली व केंद्रे महाराज मठाजवळ सांगोला रोडवर ब्रीज गरज आहे,भीमा नदीवर दोन्ही बाजूला उंच चढ आहेत,त्यामुळे दोन्ही ब्रीजची उंची साडेतीन लाख क्युसेक्स पाणी जरी महापुरात आले तरी पाण्याखाली जाणार नाहीत,याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी आणून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या बाबींची तात्काळ दखल घेतली. यामुळे पंढरपूरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
Top