महाराष्ट्रभर परतीच्या वादळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी अडचणी -संदिप मुटकुळे

 पंढरपूर ,(प्रतिनिधी)-महाराष्ट्रभर परतीच्या वादळी पावसाने थैमान घातले आहे.हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांची पिकं संपूर्ण नष्ट झाले आहे . कोरोनात घायाळ झालेल्या शेतकऱ्यांवर हा पुन्हा मोठा आघात आहे.म्हणून सरकारने तातडीने  शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करून त्यांना आधार देण्याची गरज आहे,अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी केली आहे.

   सरसकट पंचनामे गृहीत धरून मदत द्यावी. यासाठी मागील वर्षी अवकाळी,महापूर व इतर सरकारी योजनांसाठी संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती व बँकेचे खाते क्रमांक शासनाने जमा केले आहे. त्यातच थोडी फार गरज असल्यास दुरुस्ती करून ही मदत तात्काळ देणं शासनाला शक्य आहे. केंद्रानेसुद्धा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती जाहीर करून विशेष पॅकेजद्वारे शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी केली आहे.
 
Top