पंढरपूर,(नागेश आदापुरे)-खा.संभाजी राजे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधावर उतरत कासेगाव, ता. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्षबागांचे व शेतीचे नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर बोलताना खा.संभाजीराजे यांनी या फळबागा आणि पिकांच्या नुकसान भरपाईबद्दल शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न केंद्र सरकार दरबारी मांडण्याचे तसेच तातडीने कारवाईचे आश्वासन दिले.शेतमालावरील पिक विमा यामधील जाचक अटी व नियमामध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले.यावेळी आबासाहेब देशमुख,कासेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित अधिकार्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कासेगाव येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कासेगाव मधील शेतकऱ्यांचे द्राक्षबागांची व शेतीची झालेल्या नुकसानीची पाहणी करताना तातडीने शेतीचे पंचनामे करून महाराष्ट्र सरकारकडे पाठवून देण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न केंद्र सरकारकडे मांडून नुकसान भरपाईची मागणी करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले .
यावेळी आबासाहेब देशमुख,प्रशांत देशमुख,विजय देशमुख,संबंधित विभागाचे अधिकारी,तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.