रेवदंडा ,रायगड,१८/१०/२०२०-दि १६/१०/ २०२० रोजी सकाळी नऊच्या सुमारास ठाणे अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद देसाई यांना रेवदंडा बाजारपेठांमधून एका ग्रामस्थाने कळवले की मनोरुग्ण मुलगी रेवदंडा बाजारपेठेत फिरत असून अत्यंत आक्रमक झालेली आहे. तिच्या जवळचे वस्तूंची फेकाफेक करत आहे. तातडीने दामिनी पथकातील कर्तव्य असणाऱ्या बडीकाँप मपोना अभियंती भगवान मोकल,मपोना अनुष्का आशिष पुळेकर या रेवदंडा बाजारपेठेत रवाना झाल्या. कर्तव्यात असलेले पोलीस हवालदार सुनील शिंदे यांच्यासह दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी मनोरुग्ण मुलीची विचारपूस प्रयत्न केला असता ती अत्यंत आक्रमक झाली .त्यामुळे दामिनी पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी आळीपाळीने पोलीस गणवेश बदलून साध्या वेशात जाऊन मनोरुग्ण मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने काही माहिती दिली नाही. तिच्या सामान गोळा करून तिचा मोबाईल व कपडे घेऊन रेवदंडा पोलिस ठाण्यात घेऊन आले.

रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील जैतापूकर यांनी महिला पथकातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्या मुलीला विश्वासात घेऊन माहिती विचारली. तिच्याकडील सापडलेल्या मोबाईलला चार्जिंग करून एका मोबाईल क्रमांका वर फोन करून कोणाचा नंबर आहे विचारले असता त्यांनी माझी मुलगी अंकिता हिचा आहे असे सांगून त्यांचे नाव जगन्नाथ चाया पाटील, राहणार वरवटणे, नागोठणे असे सांगितले.

त्यानंतर दामिनी पथकाने ओळख सांगून चौकशी केली असता माझी मुलगी अंकिता काही महिन्यापासून मनोरूग्ण झाली असून आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेली आहे. तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा मोबाईल बंद आहे. त्यावर दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी मनोरुग्ण मुलीच्या वडिलांना दिलासा देत मुलगी अंकिता ही रेवदंडा पोलिस ठाण्यातील महिला कक्ष सुरक्षित आहे .आपण तिला घेण्याकरता रेवदंडा पोलीस ठाणे येथे येण्यास सांगितले. सदर मनोरुग्ण मुलगी अंकिताचे वडील रेवदंडा पोलिस ठाण्यात आले असता पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील जैतापूकर व दामिनी पथकातील मपोना अभियंती भगवान मोकल व मपोना अनुष्का आशिष पुळेकर यांनी अंकिता हिचे वडिलांकडे योग्य ती चौकशी करून सदर मनोरुग्ण मुलगी अंकिता ही त्यांची मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर ती सुखरूप तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

रेवदंडा पोलिसांच्या कार्यामुळे मनोरुग्ण मुलगी अंकिता हिचे वडील यांनी रायगड पोलीस दलाचे, रेवदंडा पोलिस ठाणे व दामिनी पथकाचे मनापासून आभार मानले आहेत.
 
Top